कुत्र्यांच्या हल्ल्यात हर्णेत दोन मुले जखमी

दापोली : तालुक्यातील हर्णे-पाळंदे परिसरात कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून, बुधवारी (ता. १९) दोन मुलांवर १० ते १२ कुत्र्यांनी हल्ला करून जखमी केले.

रस्त्याने जात असताना अचानक १० ते १२ कुत्री आली आणि अनव्य अक्षय सुर्वे व पुण्यातील पर्यटकांपैकी एका लहान मुलांवर हल्ला केला. या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात या दोन्हीही मुलांना चावा घेत जखमी केले. त्या दोघांना जमिनीवर पाडत त्यांना लोळवले. त्यांच्या हातावर आणि पाठीवर चावा घेतल्याने ते जखमी झाले आहेत. त्यांना ताबडतोब उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांना तातडीने रेबीजची लस देण्यात आली असून, त्यांची प्रकृती स्थिर आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 21/Mar/2025