मंडणगड : भिंगळोली येथील एका निवासी संकुलातील बंद असलेल्या फ्लॅटमध्ये गुरुवारी (ता. २०) दुपारी तीननंतर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना कळवल्यानंतर पोलिस लगेचच घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. बंद फ्लॅटमध्ये पोलिसांना मृतदेहाशेजारी एक बॅग सापडली आहे. या संदर्भात पोलिस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 21/Mar/2025














