रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीमध्ये नेत्र तपासणी शिबिर

रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमीत इंफिगो आय केअर रत्नागिरी व राष्ट्रीय सेवा योजना युनिट, फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एफएएमटी), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन फिनोलेक्स अॅकॅडमीचे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी केले.

इंफिगोच्या डॉ. शितल साळुंके यांनी चुकीच्या जीवन शैलीमुळे उद्भवणाऱ्या निरनिराळ्या नेत्ररोगाविषयी, तसेच ते होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.

या शिबिरात १७५ विद्यार्थी व विद्यार्थिनी, प्राध्यापक व कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात आली. प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी, एनएसएस युनिट प्रा. उमेश के. सामंत, प्रा. सचिन गुरव, प्रा. प्रियांका दाते, प्रा. सौरभ शहाणे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:45 PM 21/Mar/2025