मंडणगड : मंडणगड तालुक्यातील भिंगळोली येथील येथे २० मार्च रोजी सापडलेल्या अज्ञात मृतदेहाचे घटनेसंदर्भात मंडणगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्य म्हणून नोंद दाखल करण्यात आला आहे. मृताच्या खिशात असलेल्या कागदांमधील फोन नंबरवर संपर्क साधला असता मृत व्यक्ती दुधेरे या गावाची असल्याची ओळख समजली. त्यामुळे पोलिसांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांशी संपर्क साधून ओळख पटवून घेतली.
मयत व्यक्तीचे नाव अभिजीत भाऊ कदम (वय ४०, रा. दुधेरे, ता. मंडणगड) असे आहे. त्याच्या आईने मृतदेहाची ओळख पटवून देत मंडणगड पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. मृत अभिजीत यास दारु पिण्याची सवय होती. दि. १५ मार्च रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अभिजीत हा मी ठाणे येथे कामासाठी जात आहे, असे सांगून दुधेरे येथील घरातून निघून गेला. तो परत आला नाही. दि. २० मार्च २०२५ रोजी एका अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळून आला. मंडणगड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 22-03-2025














