रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील भाटये महाजनवाडी येथील पान टपरीच्या मागील मोकळ्या जागेत, दि. २१ मार्च २०२५ रोजी रात्री ८:१० वाजेच्या सुमारास गैरकायदेशीर दारूचा साठा विक्रीच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका ४५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने केलेल्या कारवाईत ४,०६० रुपये किमतीची देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार सशांत नारायण पवार (वय ३९) यांना गुप्त माहिती मिळाली होती की, भाटये महाजनवाडी परिसरात पान टपरीच्या मागे आडोशाला मोकळ्या जागेत गैरकायदेशीर दारूचा साठा ठेवून त्याची विक्री केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रात्री छापा टाकला. घटनास्थळी आरोपी कैलास सुधीर भाटकर (वय ४५) हा देशी आणि विदेशी दारूचा साठा बिगर परवानगीने आपल्या ताब्यात बाळगून विक्रीच्या तयारीत असताना आढळून आला.
या कारवाईत पोलिसांनी एकूण ४,०६० रुपये किमतीचा दारूचा साठा जप्त केला, ज्यामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
१४ बॉटल संत्रा जी.एम. देशी दारू (९० मिली) – किंमत ४९० रुपये
१० बॉटल संत्रा जी.एम. देशी दारू (१८० मिली) – किंमत ७०० रुपये
४ बॉटल टॅगो पंच देशी दारू (१८० मिली) – किंमत २८० रुपये
१० बॉटल टॅगो पंच देशी दारू (९० मिली) – किंमत ३५० रुपये
४ बॉटल सोफ देशी दारू (१८० मिली) – किंमत २८० रुपये
२ बॉटल ओल्ड मॉन्क रम (१८० मिली) – किंमत २९० रुपये
२ बॉटल मॅगडॉलन ओरिजनल (१८० मिली) – किंमत २७० रुपये
५ बॉटल इम्पीरियल ब्लू व्हिस्की (१८० मिली) – किंमत ८०० रुपये
५ बॉटल हायवर्ड्स (१८० मिली) – किंमत ६०० रुपये
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात रात्री १०:१६ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून, गुन्हा क्रमांक ११४/२०२५ असा आहे. पोलिसांनी आरोपीवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:54 22-03-2025














