रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या बळीराम परकर विद्यालय व मुरारी तथा भाई मयेकर ज्युनियर कॉलेज मध्ये न्युक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत अणू ऊर्जा जनजागृती व फिरते प्रदर्शन (ऍटम ऑन व्हील्स) दाखल झाले.
अणू ऊर्जेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी व अणू ऊर्जा किती आवश्यक आहे हे या फिरत्या प्रदर्शनातून सांगितले. १० मिनिटांच्या एका व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. अणू ऊर्जा आवश्यक असल्याबाबत आणि अणू ऊर्जा प्रकल्प चालू झाल्याने त्याचा आजूबाजूच्या भागात काय काय चांगले परिणाम होतात व ज्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यात येतो त्या भागाचा विकास होतो, अशी माहिती श्री. ठाकरे यांनी दिली. या वातानुकूलित व्हॅनमध्ये अणुऊर्जेसंदर्भात विविध प्रकारची लिखित स्वरूपातील माहिती जनजागृतीपर ठेवण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी ही माहिती वाचली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:30 22-03-2025













