IPL 2025, KKR vs RCB : कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील लढतीनं आयपीएल २०२५ स्पर्धेतील १८ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगणाऱ्या या लढती आधी उद्घाटन सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले आहे.
आयपीएल स्पर्धेत रंग भरण्यासाठी बॉलिवूडकरही सज्ज आहेत. पण कोलकाता शहरात आभाळ फाटल्यामुळे पहिल्या सामन्यावर पावसामुळे पाणी फेरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भारतीय हवामान खात्याने सध्याच्या घडीला कोलकाता शहरात ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. शनिवारी रंगणाऱ्या सामन्याच्या दिवशी कोलकाता येथी ९० टक्के पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता हा सामना रद्द करण्याची वेळ आली तर काय? असा प्रश्न चाहत्यांना पडू शकतो. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती
कमीत कमी प्रत्येकी ५ षटकांचाही खेळवला जाऊ शकतो सामना, पण..
पावसाच्या व्यत्ययामुळे सामना निर्धारित वेळेत होऊ शकला नाही तर सामनाधिकाऱ्यांना ६० मिनिटांचा अतिरक्त वेळ घेता येईल. कमीत कमी प्रत्येकी-५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा विचार केला जाऊ शकतो. या परिस्थितीत रात्री १० वाजून ५६ मिनिटांनी सामना सुरु करुन तो मध्यरात्री १२ वाजून ६ मिनिटांपर्यंत संपवावा लागेल. पण या ेेवेळेतही पावसामुळे खेळ झाला नाही तर मात्र सामना रद्द झाल्याची घोषणा करण्यात येईल.
KKR vs RCB यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला तर काय?
आयपीएल स्पर्धेतील प्ले ऑफ आणि फायनल लढतीसाठी राखीव दिवस असतो. पण ओपनिंग लढतीसह साखळी फेरीत राखीव दिवसाची तरतुद नाही. त्यामुळे जर पावसाने सामन्यावर पाणी फेरले आणि कमीत कमी षटकांचा खेळही होऊ शकला नाही तर या परिस्थितीत दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल.
कोलकाता नाईट रायडर्स संघ:
अजिंक्य रहाणे (कर्णधार), व्यंकटेश अय्यर (उप कर्णधार), मोइन अली, वैभव अरोरा, क्विंटन डी कॉक, हर्षित राणा, स्पेंसर जॉनसन, मयंक मारकंडे, सुनील नरेन, एनरिक नॉर्तजे, मनीष पांडे, रोवमन पॉवेल, अंगकृष रघुवंशी, रहमानुल्लाह गुरबाझ, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, चेतन सकारिया, रिंकू सिंह, लवनीथ सिसोदिया, वरुण चक्रवर्ती.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :
रजत पाटीदार (कर्णधार), अभिनंदन सिंह, जेकॉब बेथेल, मनोज भांडागे, स्वास्तिक चिकारा, टिम डेविड, जोश हेजलवुड, विराट कोहली, भुवनेश्वर कुमार, लियाम लिविंगस्टोन, मोहित राठी, लुंगी एनिगडी, देवदत्त पडिक्कल, क्रुणाल पांड्या, रसिख सलाम, फिल साल्ट, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंह, नुवान तुषारा, यश दयाल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:30 22-03-2025
