खेड : चिंचघर- दस्तुरी येथे तरुणाचा आकस्मिक मृत्यू

खेड : तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी येथील खडी क्रशरजवळ शनिवार, २२ मार्च रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास तयार झालेल्या पाण्याच्या डबक्यात अज्ञात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला.

या घटनेप्रकरणी खेड येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत. हा तरुण नेमका कोण, याचा शोध सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:26 AM 24/Mar/2025