दापोली : या वर्षीच्या बजेट मध्ये ३६ हजार कोटींची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आली आहे. ग्राम विकासचे राज्यमंत्री देखील रत्नागिरी जिल्ह्यातले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना कुठेही थांबणार नाही, असे राज्याचे उद्योग मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सरस २०२५ जिल्हा स्तरीय प्रदर्शन व विक्री या कार्यक्रमांतर्गत दापोली येथे बोलताना सांगितले.
२२ रोजी दापोली आझाद मैदान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी गृहराज्य मंत्री योगेश कदम आणि विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. विमानाच्या पायलट या महिला भगिनीं आहेत, विविध क्षेत्रामध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे. त्यामुळे बचत गटामध्ये महिलांनी आधुनिक राहिले पाहिजे. त्यांनी रेडिमेड गारमेंटमध्ये आले पाहिजे. त्याचबरोबर कपडे शिवून ते विकले पाहिजेत, अशा पद्धतीची भूमिका भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातील महिलांनी घ्यावी, असे नामदार उदय सामंत यांनी बोलताना सांगितले.
कोकण कृषी विद्यापीठामध्ये अगरबत्ती कारखाना सुरू करण्यासाठी काही निधी आला होता. त्यामध्ये विद्यापीठ हे ५ लाख रुपये उपलब्ध करून देणार होते त्यामध्ये काही रक्कम ही मी स्वतः देऊन जालगाव मध्ये अगरबत्तीचा कारखाना महिला बचत गटाच्या माध्यमातून सुरू केला आणि त्याची उत्पादीत मालाची विक्री देखील दापोली तालुक्यात सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील व शहरातील महिला ही स्वयं रोजगाराकडे वळत आहे, असे नामदार योगेश कदम यांनी बोलताना सांगितले.
उदय सामंत पुढे म्हणाले की, निवडणूक काळात महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये देणार असे युती सरकारने जाहीर केले होते. त्याबाबत सरकार विचारधीन आहे. याबाबात योग्य वेळी शासन निर्णय घेईल, असे ही सामंत यांनी यावेळी बोलून दाखवले. कार्यक्रमाला नागरिक व मान्यवर उपस्थित होते.
गोगावलेच रायगडचे पालकमंत्री
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत आमची शिवसेना म्हणून भूमिका स्पष्ट आहे. ज्या वेळेस भरत गोगावले हे पुन्हा निवडून येतील त्यावेळेस ते पालकमंत्री होतील असे तिन्ही पक्षात ठरले होते. आणि आजही आमचे सगळ्यांचे मत असेच आहे की भरत गोगावले यांनीच त्या ठिकाणचे पालकमंत्री व्हावे आणि यासाठी तिन्ही नेत्यांनी मिळून यावर मार्ग काढावा असे नामदार सामंत यांनी पत्रकार यांना माहिती देताना सांगितले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:58 AM 24/Mar/2025














