चिपळूण : विद्यार्थ्यांना मारझोड करणाऱ्या शिक्षिकेविरोधात ग्रामस्थांनी उठाव केल्यानंतर शिक्षण विभागाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित शिक्षिकेला तालुक्यातील अन्य शाळेत पाठवत या प्रकरणावर तूर्तास पडदा पाडण्यात आला आहे. शैक्षणिक व्यवस्थेतर्गत त्या शिक्षिकेला तालुक्यातील दुसऱ्या शाळेत तात्पुरती नियुक्ती देण्यात आली आहे.
तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असणाऱ्या एका शिक्षिकेकडून विद्यार्थ्यांना सततची मारझोड केली जात आहे. या विरोधात आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवारी थेट चिपळूण पंचायत समितीवर धडक देत गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे लेखी तक्रार दिली होती. संबंधित शिक्षिकेवर आठ दिवसांत कारवाई करावी; अन्यथा मुलांना शाळेत पाठवणार नाही, अशी भूमिका घेत शिक्षण विभागाला इशारा दिला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनाक यांनी संबंधित शिक्षिकेला तालुक्यातील एका शाळेमध्ये शैक्षणिक व्यवस्थेतर्गत पाठविण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:27 AM 24/Mar/2025














