रत्नागिरी : पोलीस नियंत्रण कक्षाच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडाची मोठी फांदी अचानक रस्त्यावर तुटून पडली. मात्र, या मार्गावरुन जाणाऱ्या एका रिक्षावर ही फांदी पडल्याने रिक्षाचे किरकोळ नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.
रत्नागिरी पोलीस नियंत्रण कक्षाच्या मागे असलेल्या आंब्याच्या झाडाची फांदी अचानक तुटून पडली. याचवेळी चर्चरोड ते विशेष कारागृहच्या दिशेने जाणाऱ्या एका रिक्षावर ही फांदी पडली. मात्र, यात कोणालाही दुखापत झाली नाही. शनिवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या मार्गावर पादचाऱ्यांची आणि वाहनांची सतत ये-जा सुरु असते. रस्त्यावर फांदी पडल्याने या मार्गावरील वाहतुक तासभर ठप्प झाली होती. पडलेली फांदी तोडून बाजूला केल्यानंतर वाहतुक पुर्ववत झाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 24/Mar/2025














