खेड : खेड तालुक्यातील सोनगाव, घाणेखुंट व लोटे गावांच्या सीमाभागात शुक्रवारी २१ रोजी वणवा लागला आहे. त्यामध्ये हजारो झाडे जळून खाक झाली असून, गेल्या दोन महिन्यात १५ पेक्षा जास्त ठिकाणी वणवा लागण्याच्या घटना घडल्या आहेत.
आज देखील लोटे औद्योगिक वसाहत परिसरात लोटे, सोनगाव व घाणेखुंट या गावांच्या सीमा भागात औद्योगिक वसाहतीच्या खुल्या जागेत भडकलेल्या वणव्यात सुक्या गवतासह अनेक लहान व मोठी झाडे आगीच्या भक्षस्थानी पडली आहेत. आगीचे लोळ ८ ते १० फूट उंचीपेक्षा जास्त उंचीचे दिसत होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 24/Mar/2025









