चिपळूण : दसपटी भागात बिबट्याचा मुक्त संचार

चिपळूण : तालुक्यातील दसपटी विभागात बिबट्याचा मोठ्या प्रमाणात संचार सुरू असून, परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. येथील कळकवणेमधील रामचंद्र पाडेकर यांच्या चार बकऱ्यांना या बिबट्याने हल्ला करून ठार केले.

या विभागातील सर्व गावांमध्ये बिबट्याचा संचार सुरू आहे. विभागात एम.आय.डी.सी. आहे, येथुन जाणारा कामगारवर्ग खुप असतो. संध्याकाळी काळोख झाला की, रात्रभर कुठे ना कुठे प्रत्येक पाळीव जनावरे हा बिबटया फस्त करत फिरत आहे. हे गेली तीन चार महिने सुरू आहे. दसपटी विभागातील कित्येक ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी यांनी लेखी व तोंडी वनविभागाला कळवले
परंतु त्यांचा कोणत्याही प्रकारचे उत्तर किंवा कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नाही, कळकवणे गावांमध्ये भगवान गमरे यांची गाय व रामचंद्र पाडेकर यांच्या चार ते पाच शेळ्या वाघाने खाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न आहे. वन्य प्राणी रस्त्यावर का उतरत आहे, यावर पण अंकुश असणे गरजेचे आहे.

या गोष्टीची लवकरच वनविभागाने दखल न घेतल्यास दसपटी विभागातील शेतकऱ्यांची जनावरे घेऊन वनविभागाच्या दरवाज्यावर सर्व शेतकऱ्यांची जनावरे बांधून आंदोलन करण्यात येईल, असे कळकवणे ग्रामपंचायत सदस्य महेश शिंदे (एम.डी.) यांनी वनविभागाला इशारा दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:35 PM 24/Mar/2025