Deputy Speaker of the Legislative Assembly Election : विधानसभा उपाध्यक्ष पदाचा निवडणूक कार्यक्रम (Deputy Speaker of the Legislative Assembly Election) जाहीर झाला आहे. मंगळवारपर्यंत (25 मार्च 2025) अर्ज दाखल करता येणार आहेत.
त्यानंतर 26 तारखेला उपाध्यक्षाची निवड होणार आहे. महायुतीत नेमकं कोणत्या पक्षाला आणि कोणत्या नेत्याला विधानसभा उपाध्यक्षपद मिळते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला होता. तर महाविकास आघाडीनं चांगलीच मुसंडी मारल्याचं पाहायला मिळालं होतं. या लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं मोठं यश मिळवलं आहे. महायुतीनं राज्यात सत्ता स्थापने केली. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. या निवडणुकीत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरल्यामुळं विधासभा अध्यक्षपदी भाजप नेत्याची निवड करण्यात आली. पुन्हा राहुल नार्वेकर यांनाचं विधासभा अध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर आता विधानसभा उपाध्यक्षपद कोणत्या पक्षाला जाणार याची चर्चा सुरु आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:59 24-03-2025














