Breaking : प्रशांत कोरटकला अटक

मुंबई : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावणारा प्रशांत कोरटकर गेल्या काही दिवसापासून फरार आहे. दोन दिवसापूर्वा प्रशांत कोरटकर देश सोडून फरार झाल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.

प्रशांत कोरटकर याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी तेलंगणा येथून कोरटकर याला ताब्यात घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याच्यावर जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीनअर्ज रद्द केल्याने जुना राजवाडा पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. अटकेच्या भीतीने तो दुबईला पळाल्याची चर्चा शनिवारी सकाळपासून प्रसार माध्यमांमध्ये सुरू होती. दुबईतील त्याचे काही फोटोही व्हायरल झाले होते. यावरून अधिवेशनात विरोधकांनी सरकारला धारेवर धरले.

दरम्यान, या अटकेवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. मिटकरी म्हणाले, तेलंगणामध्ये तो लपल्याची माहिती मिळाली होती. तब्बल एक महिना हा भामटा फिरत होता. इतक्या उशीरा अटक झाली. पण अटक झाली हे महत्वाच आहे. राहुल सोलापूरकर हा पण मोकाट राहता कामा नये. पोलिसांचे याबद्दल मी आभार मानतो. नागपूर पोलिसांच्या कारभारावर माझ पहिल्यापासून प्रश्नचिन्ह होते. तो नागपूरातून हैदराबादला फरार झाला, असंही मिटकरी म्हणाले.

फडणवीसांनी पोलीस त्याला पकडतील, असा विश्वास व्यक्त केला होता

फिर्यादी सावंत यांनी जुना राजवाडा पोलिसांची भेट घेऊन कोरटकरचा पासपोर्ट जमा करून घेण्यासाठी त्याच्या पत्नीला नोटीस पाठवण्याची विनंती केली. मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनाही याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर कोरटकर कुठेही गेला तरी पोलिस त्याला पकडतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. दरम्यान, त्याच्या पत्नीने तपासासाठी नागपुरात असलेल्या कोल्हापूर पोलिसांकडे कोरटकर याचा पासपोर्ट देऊन अफवा आणि चर्चांना पूर्णविराम दिला होता. दरम्यान, आज पोलिसांनी कारटकर याला तेलंगणा येथून अटक केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:15 24-03-2025