रत्नागिरी/ प्रतिनिधी:आजच्या काळात सर्व आघाड्यांवर लढणाऱ्या महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. नेमके हेच हेरून पूजा पवार यांनी प्रभाग क्रमांक पाच आणि सहाच्या महिलांसाठी मोफत झुम्बा क्लासेस सुरू केले आहेत. प्रभागातील सर्व महिलांनी याचा लाभ घ्यावा आणि आपले आरोग्य, मनस्थिती जपावे असे आवाहन ज्येष्ठ नगरसेविका शिल्पा ताई सुर्वे यांनी केले.रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत आणि रत्नसिंधू योजनेचे निमंत्रित सदस्य किरणाजी सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली कृतिशील नेत्या सौ. पूजा दीपक पवार यांनी प्रभाग पाच व सहाच्या महिलांसाठी घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर झुंबा क्लासेस सुरू केले. त्यांचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेविका आणि मार्गदर्शक शिल्पाताई सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.सौ. पूजा पवार नेहमीच प्रभागातील नागरिकांच्या अडचणी, समस्या सोडवण्यासाठी तसेच उत्कर्षासाठी झटत असतात. या नवरात्रात त्यांनी पुढाकार घेऊन मा. बाळासाहेब ठाकरे ॲक्टिव्हिटी सेंटर येथे प्रभागातील महिलांसाठी मोफत झुंबा क्लासेस सुरू केले आहेत. दि. ३ ऑक्टोबरपासून ९० दिवसांसाठी सायंकाळी ५.३० ते ६.३० वाजता हे क्लासेस होणार असून प्रभागातील महिलांसाठी ते मोफत ठेवण्यात आले आहेत. सद्यस्थितीत सुमारे पंचेचाळीस महिला या क्लास चा लाभ घेत आहेत. सौ. पूजा पवार यांनी राबवलेला हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सुनील शिवलकर, शिवानी पवार, सेजल शिंदे, काव्या कामतेकर, अंजली सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.