कामगारविरोधी धोरणावर २८ मार्चला कामगार संमेलन

चिपळूण : राज्य सरकारकडून येऊ घातलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयकामुळे कामगार देशोधडीला लागणार आहेत. त्या विरूद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी मोठ्या शक्तिनिशी कामगार संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस व कुंभार्ली (ता. चिपळूण) गावचे सुपुत्र गोविंदराव मोहिते यांनी केले आहे.

हे संमेलन दि. २८ मार्च रोजी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या (परेल-मुंबई) महात्मा गांधी सभागृहात दुपारी २ ते ५ या वेळेत होणार आहे. राज्य सरकारने लोकशाही अधिकारावर हल्ला करणारे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक पारित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आमदार सचिन अहिर या आंदोलनाच्या नेतृत्वात सहभागी होतील, अशी आशा गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:40 PM 25/Mar/2025