रत्नागिरी : टिळक आळीत शुक्रवारी ऋग्वेद संहिता स्वाहाकार पूर्णाहुती

रत्नागिरी : शहरातील टिळक आळी गणेशोत्सव मंडळाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त दर महिन्याला सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित करत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत २३ मार्चपासून रोज ऋग्वेद संहिता स्वाहाकाराचे आयोजन करण्यात आले होते. त्याची पूर्णाहुती शुक्रवार २८ मार्च रोजी होणार आहे.

हा ऋग्वेद संहिता स्वाहाकार सिंधुदुर्गातील ज्येष्ठ वेदमूर्ती श्री. मुरवणे गुरुजी व त्यांचे घनपाठी विद्यार्थी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. रोज सकाळी ७ ते २ या वेळेत हा स्वाहाकार चालतो व संध्याकाळी ७ वाजता आरती होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:51 PM 25/Mar/2025