रत्नागिरी : सालाबाद प्रमाणे यंदाही गुढी पाडव्याला रत्नागिरी शहरात नववर्ष स्वागतयात्रा ग्राममंदिर ते समाजमंदिर यात्रा काढण्यात येणार आहे.
या यात्रेचे आयोजन श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था, रत्नागिरी यांच्यावतीने रविवार दि. ३० मार्च २०२५ रोजी गुढी पाडव्याला हि नववर्ष स्वागतयात्रा ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी निघणार असून त्याचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे.
यात्रा मार्ग : श्री देव भैरी मंदिर – जयस्तंभश्री मारुती मंदिर – जयस्तंभ- श्री पतितपावन मंदिर
सकाळी ९.०० वाजता श्रीदेव भैरी मंदिर आणि मारुती मंदिर सर्कल येथे पारंपारिक वेशभूषेत बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट, रत्नागिरीचे अध्यक्ष रवींद्र (मुन्ना) सुर्वे आणि श्री पतितपावन संस्था, रत्नागिरीचे अध्यक्ष उन्मेष शिंदे यी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:19 26-03-2025









