रत्नागिरी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मेळावा (कै.) प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे सोमवारी (ता. ७) आयोजित करण्यात आला आहे. या वेळी जिल्ह्यातील ५ हजार महिला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे आठवडा बाजार नाका ते काँग्रेस भवन नाका दरम्यान वाहतुकीस प्रतिबंध करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. महिला सशक्तीकरण व सक्षमीकरणाच्या मार्गदर्शक मेळावा सोमवारी दुपारी एक वाजता पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय मेळावा होत आहे.
यासाठी मोठी गर्दी होणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी टाळण्याकरिता व कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आठवडा बाजार नाका ते काँगेस भवन नाका दरम्याने सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद केला आहे. तसेच काँग्रेस भवन-मुरलीधर मंदिर-भूते नाकामार्गे आठवडा बाजार या पर्यायी मार्गान वाहतूक वळविण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 07/Oct/2024