आंबा निर्यातप्रश्नी लवकरच नवीन मार्गदर्शक नियमावली

मुंबई : कृषी विद्यापीठांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेत दिली.

चित्रा वाघ, प्रवीण दरेकर यांनी राज्यातील आंबा व काजू पिकाच्या निर्याती संदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना ते बोलत होते. राज्यमंत्री जयस्वाल म्हणाले, कोकणातील आंबा हा जगामध्ये निर्यात केला जातो. शेतकऱ्यांना वेळोवेळी प्रबोधन, व्यवस्थापन आणि मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विद्यापीठामार्फत केले जाते.

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना कीटक नाशके, औषध फवारणी याचबरोबर निर्यात करताना काळजी घ्यावी लागते. कोकणातील आंबा उत्पादनाबरोबरच राज्यात वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेतली जातात. राज्यातील पिकाचे लागवड क्षेत्रानुसार कृषी विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग समन्वय करेल, असे ते म्हणाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:43 AM 26/Mar/2025