रत्नागिरी : शहरातील मांडवी येथील झाडीझुडपात मद्यपान करणाऱ्या दोन तरुणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक दिलीप विलणकर (वय २९) व ओमकार राजकुमार वाडेकर (वय ३०) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना रविवारी (ता. २३) सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या सुमारास मांडवी येथील रस्त्याच्या बाजूला झाडीझुडपात निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित तरुण हे झाडीझुडपात मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व पोलिस हेड कॉन्स्टेबल भालचंद्र मयेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 26-03-2025














