रत्नागिरी तालुकास्तरीय प्राथमिक शिक्षक प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत एकांत इलेव्हन विजयी

जाकादेवी : रत्नागिरी तालुका प्राथमिक शिक्षक प्रीमियर लीग (टिपीएल) क्रिकेट स्पर्धा तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांसाठी २१ व २२ मार्च रोजी मालगुंड येथे डॉ. नानासाहेब मयेकर क्रीडा नगरी खारभूमी येथे झाल्या.

तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना ६ संघांमध्ये लिलाव पद्धतीने विभागण्यात आले होते. या संघात जयभैरी संघमालक सचिन झरवे, संदेश वासावे, कोकरे फायटर्स संघ मालक चंद्रकांत कोकरे, एकांत इलेव्हन संघ मालक संतोष रावणंग, एनपी रायडर्स संघ मालक दीपक नागवेकर, मनोज पागदे, एसबीसी हीटर्स संघ मालक संजय बैकर, दीपक खेडेकर, आणि जीएस सुपरस्टार संघ मालक शंकर कळंबटे हे संघ स्पर्धेत सहभागी झाले होते. हे स्पर्धेचे ५ वे वर्ष आहे.

या स्पर्धेतील अंतिम सामना एकांत इलेव्हन आणि एनपी रायडर्स या दोन संघांच्या दरम्यान झाला आणि यामध्ये एकांत इलेव्हन संघ अंतिम विजेता ठरला. अटीतटीच्या लढतीत एकांत इलेव्हन संघाने एनपी रायडर्स संघावर विजय मिळवून टीचर प्रीमियर लीग स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले. मालिकावीर म्हणून संजीवन दराडे, उत्कृष्ट फलंदाज सचिन पाटील, उत्कृष्ट गोलंदाज ज्ञानराज कदम, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गुलाब पाटील यांना गौरवण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 26/Mar/2025