IPL 2025: आयपीएलचे Latest Points Table, जाणून घ्या..

IPL 2025 Points Table: पंजाब किंग्सने गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans vs Punjab Kings) 11 धावांनी पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएल हंगामाची सुरुवात विजयाने केली.

प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 243 धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात टायटन्सला 20 षटकांत 5 गडी गमावून फक्त 232 धावा करता आल्या. पंजाब किंग्सच्या या विजयानंतर आयपीएलच्या गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे.

आयपीएल 2025 चा हंगाम 22 मार्चपासून सुरु झाला आहे. आतापर्यंत 5 सामने खेळवण्यात आले आहे. या पहिल्या पाच सामन्यातच गुणतालिकेत अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळाले. सनरायझर्स हैदराबाद गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. हैदराबादचे दोन गुण आहेत. नेटरनरेट इतर संघांच्या तुलनेत खूप चांगला असल्याने हैदराबादचा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सविरुद्ध विजय मिळवणारा चेन्नई सुपर किंग्ज चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय, दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. या सर्व संघांचे 2-2 गुण समान आहेत.

कोणत्या संघांचा पराभव झाला?

लखनौ सुपर जायंट्स व्यतिरिक्त, मुंबई इंडियन्स, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांना पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. त्याच वेळी, मुंबई इंडियन्सना चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. तर पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. या हंगामातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. याशिवाय सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 26-03-2025