चिपळूण : जलसंपदा विभाग, चिपळूण नगर परिषद आयोजित जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापासून नारायण तलावपर्यंत रॅली काढण्यात आली. नारायण तलाव येथे जलपूजन करण्यात आले. जल दिना निमित्त विद्यार्थ्यांचे मनोगत सादर झाले. सहभागी विद्यार्थी व शाळा कॉलेज यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
यामध्ये युनायटेड इंग्लिश स्कूल मधील विद्यार्थी, शिक्षक, डिबीजे कॉलेज एनएसएस विभागाचे विद्यार्थी, शिक्षक, आनंद पवार महाविद्यालयाचे शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, अधिकारी, मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढामकर, उद्यान विभागप्रमुख प्रसाद ऊर्फ बापू साडविलकर, रोहित खाडे, सतीश दंडवते, सुजित जाधव, महेश जाधव, सागर सावंत, आस्थापना प्रमुख राजेंद्र जाधव, राणी महाडिक, पूनम भोजने, जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता विपुल खोत, जलदूत शाहनवाज शाह सोबत अनेक नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात पाणी वाचवणे, जल प्रदूषण टाळणे या विषयावर मनोगत व्यक्त करून जनजागृती करण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:14 PM 26/Mar/2025














