खेड : तालुका आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत तालुक्यात २९ मार्चपर्यंत शाळा व अंगणवाड्यांमध्ये बालकांची आरोग्य तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी शैलेश खरटमोल यांच्या मार्गदर्शनाखाली जन्मजात व्यंग, कमतरता, आजार शोधून त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
१ मार्चपासून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेतंर्गत आतापर्यंत धामणंद, संगलट, लोटेमाळ-चाळकेवाडी, धामणंद, संगलट, लोटे-गावठण, धामणंद, शरवली, लोटे-दिक्षीतवाडी, कुरवळ, नांदगाव, लोटे-विठ्ठल, मुसद, सुसेरी, सोनगाव-मठ, सोनगाव-भोईवाडी, सापिर्ती, घोगरे, दहिवली, शिंगरी, सोनगाव-घागवाडी, तसेच सोनगाव-ब्राह्मणवाडी, पोसरे, तळे, घाणेखूंट बौध वेरळ मावळतवाडी, तळे आदी शाळा, अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
तसेच २५ मार्च रोजी लोटे-चाळके, २६ रोजी कोडिवली-अंबरेवाडी, २७ रोजी कोंडिवली-अरकटेवाडी येथील अंगणवाडी व शाळामध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. पथकात डॉ. विलास शेळके, डॉ. मुजावर यांचा समावेश आहे. तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश खरटमोल यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 26/Mar/2025














