खेडमध्ये कचऱ्यापासून महिन्याला ५ टन खतनिर्मिती

खेड : शहरासह ग्रामीण भागात वाढत्या कचऱ्याची विशेषतः प्लास्टिकयुक्त कचऱ्याची प्रशासनासाठी समस्या डोकेदुखी स्थानिक ठरत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात जागेअभावी कचऱ्याच्या व्यवस्थापनाचा प्रश्न जटील बनत असताना शहरात मात्र विविध प्रभागांतून दिवसाकाठी ६ ते ७ टन उचलल्या जाणाऱ्या कचऱ्याचे अपुऱ्या जागेत व्यवस्थापन होत आहे. न. प. च्या कचरा डेपोत ऑर्गेनिक वेस्ट कम्पोस्ट मशिनच्या सहाय्याने ओल्या कचऱ्यापासून महिन्याला सुमारे ५ टन खतनिर्मिती केली जात असून हे खत ५ रुपये किलो दराने विकलेही जात आहे.

२.०१ चौ. किमी इतके क्षेत्रफळ असलेल्या नगर परिषद हद्दीत एकूण ७ प्रभाग आहेत. अंदाजे २० हजाराहून अधिक लोकसंख्या असून शहरात दिवसेंदिवस लोकवस्ती, टोलेजंग इमारती, छोटी-मोठी दुकाने, हॉटेल्स, टपरीवाले, फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. यात ग्रामीण भागातील ग्रामस्थही शहरात विविध कारणांसाठी वास्तव्य करत आहेत.

शहर स्वच्छतेसाठी न. प. च्या स्वच्छता विभागात कायमस्वरूपी व कंत्राटी असे ६० सफाई कर्मचारी कार्यरत असून ट्रॅक्टर, छोटाहत्ती, अॅपे रिक्षा, छोटे ट्रॅक्टर, टीपर, डम्पर आदी १२ छोट्या-मोठ्या वाहनातून सुका व ओला कचरा उचलला जात आहे. गोळा केलेला कचरा समर्थनगर येथील कचरा डेपोत सुका व ओला असे वर्गीकरण करून त्यातील ओल्या कचऱ्यातून ऑर्गेनिक वेस्ट कंम्पोस्ट मशिनच्या सहाय्याने खतनिर्मिती केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 26/Mar/2025