लांजा : लांजा तालुक्यातील शेतीसह जोड व्यवसायाबरोबरच नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा मिळण्यासाठी लांजा तालुक्यात धरणं उभारणीची चळवळ रुजली. शासनाच्या जलसंधारण च जलसंपदा विभागाकडून तालुक्यातील तब्बल १३ धरणांची उभारणी करण्यात आली. त्यामधील लघुपाटबंधारे विभागाने बांधलेल्या केळंबे तलावात अनेक वर्षांपासून पाणी व्यवस्थापनाअभावी खडखडाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे बांधण्यात आलेल्या तलावाचे फलित काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
डिसेंबर ते जानेवारी महिन्यामध्येच केळंबे तलावाचा पाणी साठा पूर्णतः खालावला जातो. गेली अनेक वर्षांपासून केवळ पावसाचे पाणी साठवले जाते, तर साठवलेले पाणी डिसेंबरअखेरपर्यंत आटून जाते. त्यानंतर जानेवारी ते जून असे ६ महिन्यांपर्यंत केळंबे तलाव पूर्णतः कोरडा पडतो.
जिल्ह्यात सर्वात जास्त तलाव आणि धरणांचा तालुका म्हणून लांजा तालुक्याला ओळखले जाते. मात्र, धरणांसाठी ओळख असलेल्पा तालुक्यात जल व्यवस्थापनाचा अभाव दिसून येतो आहे. तालुक्याच्या पूर्वेकडील व पश्चिमेकडील गावांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईची झळ सोसावी लागत होती.
सध्या लांजा तालुक्यात पाणी टंचाईचे प्रमाण कमी झाले आहे. सध्या लांजा तालुक्यामध्ये एकूण तेरा धरणे आहेत. यामध्ये खोरनिनको, वेरवली बेर्डेवाडी, बेनी खुर्द, केळंबे-खेरवसे, झापडे, कोंडये, शिपोशी, कुबे, व्हेळ, गवाणे, पन्हळे, हर्दखळे या गावांमध्ये धरणे व तलावांमध्ये पाणी साठा केला जातो आहे, तर लांजा तालुक्यात पालू येथे एक नव्याने धरण प्रकल्पाचे काम सुरू झाले.
शासनाच्या जलसंपदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून बांधण्यात आलेली धरण, तलाव यांच्यावर जिल्हा लघु पाठबंधारे विभागाचे नियंत्रण आहे. धरणांच्या माध्यमातून नदीच्या प्रवाहाने, बंदिस्त व ओपन कालव्याद्वारे पाण्याचा विसर्ग करून नदी शेजारील दुर्गम भागातील गावांची जमीन क्षेत्र ओलिताखाली आणली जात आहेत. बेनीखुर्द, केळंबे, पन्हळे, कुबे, कोंडये, गवाणे, झापडे या भागातील तलाब जनतेला व बागायतदार शेतकऱ्यांना वरदान ठरत आहेत. असे असले तरी दुर्गम भागात पाणीटंचाईला जावे लागते आहे. त्यामुळे धरणाच्या पाण्याचे सुयोग्प व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.
सुरळीत आणि नियोजनबद्ध पाणीसाठा केल्यास केळंबे, विवली, खेरवसे, गाव परिसरातील भू-भाग ओलिताखाली येईल. मात्र, केळंबे तलावाच्या पाण्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे शेतकरी व नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरवर्षी लाल माती, खडकाळ पात्रामुळे कोरड्या दिसणाऱ्या तलावात पाणीसाठा कसा होणार, असा शेतकरी व नागरिकांना प्रश्न पडला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 27/Mar/2025












