चिपळुणात भंगार गोडाऊनला भीषण आग

चिपळूण : चिपळूण-कराड मार्गावरील पिंपळी येथे बुधवारी (दि. २६) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास भंगार गोडाऊनला आग लागली. या आगीमध्ये मोठे नुकसान झाले आहे. चिपळूण परिसरात असलेल्या भंगार गोडाऊनला मार्च एन्डींगच्या पार्श्वभूमीवर आगी लागत असल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत.

आठ दिवसांपूर्वी गुहागर बायपास रोडवरील एका भंगार गोडाऊनला आग लागून मोठे नुकसान झाले होते. त्याआधी देखील खेर्डी एमआयडीसी, लोटे एमआयडीसीमध्ये भंगार गोडाऊनच्या आगीचे प्रकार समोर आले आहेत. बुधवारी दुपारी पिंपळी येथे भंगार गोडाऊनला आग लागली. या गोडावूनमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे ड्रम असल्याने आग मोठ्या प्रमाणात पसरली.

या आगीमध्ये संपूर्ण गोडावून जळून खाक झाले आहे. तीन अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू होते. ही आग उशिरा विझविण्यात यश आले. मात्र, या आगीत मोठे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 27/Mar/2025