रत्नागिरी : राजेंद्रनगर येथून टर्की पावडर बाळगणाऱ्या तरुणाला रंगहाथ पकडले

रत्नागिरी : जिल्ह्यात मद्य प्राशन, अंमली पदार्थ यावर पोलिसांची करडी नजर आहे. तरी देखील तरुणाई नशेच्या विळख्यात जात असल्याचे चित्र जिल्ह्यात पहायला मिळत आहे. पोलिसांकडून कडक कारवाई केली जाते. नुकतेच शुक्रवारी पोलिसांनी अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या तरुणाला पोलिसांनी रंगहाथ पकडले. त्याच्याकडून ५० हजार ३५० रुपयांचा अंमलीपदार्थ जप्त केला असून अटक करण्यात आली आहे.

पोलिस प्रशासनाकडून सातत्याने मद्य, अमली पदार्थ, गुटखा तसेच मटका-जुगार यावर कारवाई केली जाते. कायद्याचा बडगा कडक नसल्यामुळे पुन्हा-पुन्हा त्याला पाने फुटत असल्याचे शहरात चित्र आहे. गेल्या शुक्रवारी (ता. ४) नवरात्रोउत्सवाचे मंगलमय दिवस सुरु असून जिल्ह्यास राज्यात कडक बदोबस्त आहे. तरी देखील गोपनिय माहितीच्या आधारे पोलिसांनी शहरातील माळनाका -थिबापॉईटकडून राजेंद्रनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अगदी एका कॉलेजच्या गेटजवळ पोलिसांनी संशयित तरुणाला रंगहाथ पकडले.

मतिन महामुद शेख (वय ३१, रा. ओसवालनगर रोड, उद्यमनगर, रत्नागिरी) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता ५० हजार ३५० रुपयांचा टर्की (ब्राऊनहेराईन सदृश्य) हा अंमली पदार्थ व इतरा साहित्य त्याच्याकडे आढळले. यामध्ये १० हजार ८५० रुपयांची एक पारदर्शक प्लास्टीक पाऊच त्यामध्ये टर्की (ब्राऊन हेरॉईन सदृश्य) हा अमली पदार्थ असून त्याचे प्लास्टीक पिशवीसह वजन २ ग्रॅमचे असून त्यामध्ये ३१ पुडया आढळल्या. एका पुडीची किमंत ३५० रुपये असल्याचे पुढे आले आहे. तर ३१ लहान कागदाचे तुडे टर्की पावडर ब्राउन हेरॉईन च्या पुड्या बांधण्यासाठी. तसेच संशयिताच्या खिशात एक लायटर, एक सिगारेट, एक मोबाईल हॅण्डसेट ४ हजार ५०० रुपयांचा व ३५ हजाराची दुचाकी (क्र. एमएच-०८ पी ५०२५) असे एकूण ५० हजार ३५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

या प्रकरणी पोलिस हेड कॉनस्टेबल योगेश नार्वेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र मद्य, अंमली पदार्थ, मद्य विक्री यावर पोलिस प्रशासनाकडून कारवाई होत असतानाही त्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत असल्यामुळे तरुणाई मद्य, अमली पदार्थ्यांच्या विळख्यात अडकत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 07-10-2024