मंडणगड : तालुक्यातील कोन्हवली गाव परिसरात लागलेल्या वणव्यात सुमारे पाच एकर क्षेत्रांत मोहरलेली व फळधारणा झालेली आंबा, काजूची झाडे जळून खाक झाली. अज्ञाताने लावलेल्या या वणव्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीची भरपाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
कोन्हवली गावाचे हद्दीत अचानक हा वणवा पेटला. त्यामध्ये आग प्रचंड भडकत गेल्याने सुमारे पाच एकर क्षेत्रांतील शेतकरी वंदना तांबे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांची आंबा व काजूची फळझाडे यामध्ये जळून खाक झाली. एप्रिल व मे महिना हा उत्पादनाचा काळ असल्याने झालेले नुकसान हे शेतकऱ्यांना हतबल व निराश करणारे आहे.
तलाठ्यांनी या घटनास्थळास भेट देऊन घटनेचा पंचानामा करून तो पुढील प्रक्रियेसाठी पाठवला आहे. वणव्यामुळे झालेल्या पीक नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना तातडीने मिळावी, अशी आग्रही मागणी करण्यात येत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:12 AM 27/Mar/2025














