चिपळूण : लोकांबरोबर वादावादी केल्यानंतर याचे कारण समजून घेत असताना दोघा तरुणांनी चिपळूण पोलीस ठाण्यात पोलीस अंमलदाराला धक्काबुक्कीसह शिवीगाळ केल्याची घटना शुकवारी घडली. या प्रकरणी त्या दोघांना अटक करण्यात आली असून शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
सचिन दादासो तुपे (34), विशाल वसंत खांडेकर (24, खानापूर-सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. याची फिर्याद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक सोमनाथ राठोड यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन तुपे, विशाल खांडेकर या दोघांनी कळंबस्ते फाटा येथे ग्रामस्थांशी वादावादी केली होती. या पकरणी त्यांना पोलीस ठाण्यात आणल्यांनतर झालेल्या वादावादीचे नेमके कारण अशोक राठोड हे समजून घेत होते. त्यावेळी ते त्यांचे शासकीय कर्तव्य बजावत होते. असे असताना विशाल खांडेकर याने राठोड यांचा गळा पकडून त्यांना शिवीगाळ केली.
याशिवाय त्यांची वर्दीही खेचली. या प्रकरणी राठोड यांच्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केल्यासह शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर त्या दोघांना अटक करुन शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:05 07-10-2024