मंडणगड : गृहराज्यमंत्री आमदार योगेश कदम यांनी तालुक्याच्या नुकत्याच केलेल्या दौऱ्यात देव्हारे येथे केलेल्या घोषणेनुसार भिंगळोली येथील युवासेनेच्या कार्यालयात तालुक्यातील नागरिकांचे प्रशासकीय यंत्रणेशी संबंधित प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार आयोजित करण्यात आला. यापुढील काळात दर बुधवारी जनसंपर्क कार्यालय सुरू राहणार आहे. सहा महिन्यांनी होणाऱ्या जनता दरबारामध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम उपस्थित राहणार आहेत.
जनसंपर्क कार्यालयात झालेल्या संवाद कार्यक्रमाला स्वीय सहाय्यक मोरे, दत्ता क्षीरासागर, तालुकाप्रमुख प्रताप घोसाळकर युवासेना प्रांत कार्यकारिणी सदस्य चेतन सातोप, अस्मिता केंद्रे, इरफान बुरोंडकर, सिद्धेश देशपांडे, प्रतीक पोतनीस उपस्थित होते. नागरिकांनी महसूल विभाग पंचायत समिती पाणीपुरवठा विभागासह विविध शासकीय कार्यालयांशी संबंधित वैयक्तीक व सार्वजनिक समस्या मांडल्या. त्यासाठी प्रत्यक्ष कार्यवाही सुरू केली.
युवासैनिकांची मागणी पूर्ण
भिंगळोली येथील युवासेनेच्या कार्यालयात नागरिकांच्या समस्या सोडवणारी व्यवस्था असावी, अशी युवासैनिकांची मागणी होती. ती गृहराज्यमंत्र्यांनी पूर्ण केली आहे. तालुक्यातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन प्रशासकीय यंत्रणांशी संबंधित समस्या व अडचणी सोडवून घ्याव्यात, असे आवाहन युवासेना प्रांत कार्यकारिणी सदस्य चेतन सातोपे यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 27/Mar/2025









