गुवाहाटी: आयपीलच्या 18 व्या हंगामातील पहिला विजय मिळवण्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला यश आलं आहे. केकेआरनं राजस्थान रॉयल्सला(Rajasthan Royals) 8 विकेट राखून पराभूत केलं. कोलकाता नाईट रायडर्सचे (Kolkata Knight Riders) गोलंदाज आणि क्विंटन डीकॉकनं केलेली फलंदाजी याच्या जोरावर विजय मिळवला.
केकेआरचा हा यंदाच्या आयपीएलमधील पहिला विजय ठरला. कोलकाता नाईट रायडर्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणे यानं टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अजिंक्य रहाणे याचा हा निर्णय केकेआरच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. केकेआरला राजस्थानला 151 धावांमध्ये यश आलं. विजयासाठी आवश्यक असलेली धावसंख्या 18 व्या ओव्हरमध्येच पूर्ण केली.
राजस्थाननं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात समाधानकारक झाली नाही. मोईन अली 5 धावांवर धावबाद झाला. मात्र, दुसरीकडे क्विंटन डी कॉक यानं एका बाजूनं कोलकाताचा डाव सावरला. कर्णधार अजिंक्य रहाणे 18 धावा काढून बाद झाला. तर, क्विंटन डी कॉकनं 61 बॉलमध्ये 6 षटकार आणि 8 चौकार मारत 97 धावा केल्या. अंगकृष रघुवंशी 22 धावा करुन नाबाद राहिला.
राजस्थानच्या हातून मॅच कधी निसटली?
यशस्वी जयस्वाल आणि रियान पराग यांची भागिदारी सुरु होती. रियान पराग आठव्या ओव्हरमध्ये बाद झाला. त्यानं 25 धावा केल्या. त्यापुढच्याच ओव्हरमध्ये मोईन अलीनं यशस्वी जयस्वालला 29 धावांवर बाद केलं. त्यानंतर पुढच्या दोन ओव्हरमध्ये नितीश राणा आणि वानिंदू हसरंगा बाद झाले. त्यामुळं राजस्थाननं 8,9,10,11 व्या ओव्हरमध्ये ज्या चार विकेट गमावल्या तिथंच सामना त्यांच्या हातातून निसटला. या चार विकेटमध्ये वरुण चक्रवर्तीच्या 2 आणि मोईन अलीच्या दोन विकेटचा समावे होता.
केकेआरच्या गोलंदाजांनी आज प्रभावी गोलंदाजी केली. वरुण चक्रवर्ती, मोईन अली, हर्षित राणा, वैभव अरोरा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
केकेआरचा पहिला विजय, राजस्थानचा दुसरा पराभव
गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळाला आहे. तर, राजस्थान रॉयल्सला दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्यानं रियान पराग नेतृत्त्व करतोय.
केकेआरचा संघ :क्विंटन डिकॉक (विकेटकीपर),व्यंकटेश अय्यर, अजिंक्य रहाणे (कॅप्टन), रिंकू सिंग, मोईन अली, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, स्पेंसर जॉनसन, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती
राजस्थानचा संघ : यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन, नितीश राणा, रियान पराग (कॅप्टन), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), शिम्रोन हेटमायर, वानिंदु हसरंगा, जोफ्रा आर्चर, महेश थीक्षाना, तुषार देशपांडे, संदीप शर्मा
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:32 27-03-2025
