चिपळूण : सण, उत्सव साजरे करताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कोणतेही वर्तन करू नये. सोशल मीडियावर एखादी पोस्ट करताना सामाजिक सलोखा, तसेच धार्मिक भावना दुखावणार नाही, याची खबरदारी सर्वांनी बाळगावी. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत केले.
चिपळूण तालुका शांतता कमिटीची बैठक झाली. या वेळी राजमाने म्हणाले, चिपळूण तालुक्यात नेहमीच जातीय सलोखा जपला जात आहे. येथे सर्वच जातीधर्मातील लोक हे गुण्यागोविंदाने राहात आले आहेत. हाच वारसा पुढेही जपला जाईल, हीच शिकवण इथल्या नागरिकांची असल्याचे सांगितले. बैठकीला पोलिस निरीक्षक फूलचंद मेंगडे, सचिन सावंत, भारत पाटील, शांतता समितीचे शौकत मुकादम, प्रतापराव शिंदे, उमेश सकपाळ, विनोद झगडे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 28/Mar/2025














