चिपळूण : खेर्डी येथील अग्निशमन दल सुरू होणार

चिपळूण : पिंपळी येथे भंगाराच्या गोदामाला अचानक आग लागल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जवळपास आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन बंब नसल्यामुळे गैरसोय झाली. खेर्डी एम. आय. डी. सीत अग्निशमन केंद्र असून तिथे अग्निशमन बंब नसल्यामुळे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे यांनी पाठपुरावा केला आहे.

आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून व पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या सूचनेनुसार खेर्डी येथील अग्नीशमन केंद्र चालू होणार आहे. खेर्डी व पिंपळी या दोन गावातील अंतर अतिशय कमी असल्याने जर खेर्डी येथील अग्निशमन केंद्र चालू असते तर होणारी नुकसान टाळता आले असते.

यापूर्वीही अग्नीशमन केंद्र चालू व्हावे म्हणून लोकप्रतिनिधींमार्फत एम. आय. डी. सीकडे संपर्क साधला होता. पालकमंत्री यांनी अधिक्षक अभियंता यांना तातडीने खेर्डी येथील अग्निशमन केंद्र चालू करण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 AM 28/Mar/2025