मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेविरोधात (Shreyas Talpade) फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. उत्तर प्रदेशमधील चीटफंड घोटाळ्याप्रकरणी तो कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. त्याच्यासोबत अन्य १४ जणांविरोधातही FIR दाखल झाली आहे.
तसंच यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातही श्रेयसविरोधात तक्रार दाखल झाली होती. गावकऱ्यांना पैसे दुप्पट करुन मिळेल असं आश्वासन देत कोटी रुपये घेऊन कंपनी पसार झाली. श्रेयस या कंपनीचा प्रमोटर असल्याने आता तोही अडचणीत सापडला आहे.
द लोणी अर्बन मल्टी स्टेट क्रेडिट अँड थ्रिफ्ट को ओपरेटिव्ह सोसायटी असं या कंपनीचं नाव आहे. गेल्या १० वर्षांपासून ही कंपनी अस्तित्वात आहे. अनेक गावकऱ्यांनी कंपनीत गुंतवणूक केली. अनेक लोकांनी २० हजार ते ३ लाखापर्यंत पैसे गुंतवले. ३० गावकऱ्यांनी या कंपनीविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. श्रेयस तळपदे या कंपनीचं प्रमोशन करत होता. त्यामुळे आता त्याच्याही विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल झाली आहे. सध्या पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
समीर अग्रवाल, पत्नी सानिया, आर.के. शेट्टी, संजय मुदगिल, श्रेयस तळपदे, ललित विश्वकर्मा, डालचंद कुशवाहा, सुनील विश्वकर्मा, सचिन रैकवार, कमल रैकवार, सुनील रैकवार, महेश रैकवार, मोहन कुशवाहा, नारायण सिंह राजपूत आणि जितेंद्र नामदेव यांच्याविरोधात कमल ४१९ आणि ४२० अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:52 28-03-2025
