खेड : खेड नगरपरिषद कार्यालयालगत असलेल्या छोटेखानी उद्यानात मोकाट जनावरांचा सुरू असलेला वावर रोखण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी उद्यानाच्या सभोवतालची संरक्षक जाळी हटवण्यात आली आहे.
नगर परिषदेच्या कार्यालयासमोरच छोटेखानी उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. उद्यानात कारंजा देखील बसवण्यात आला होता. सुरुवातीचे काही दिवस वगळता त्यानंतर कारंजा बंद पडल्याने उद्यान केवळ नावापुरतेच उरले होते. याच उद्यानाचा वापर काहीजण दुचाकी उभी करण्यासाठी करत होते.
याशिवाय उद्यानात मोकाट जनावरांच्या शिरकाव्याने अस्वच्छताही निर्माण होत होती. मोकाट जनावरांना पिटाळण्याची तसदी कोणीही घेत नसल्याने मोकाट जनावरे उद्यानातच बस्तान ठोकत होती. या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा वावर रोखण्यासाठी उद्यानालगत संरक्षक भिंत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी आवश्यक त्या निधीचीही तरतूद करण्यात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 PM 28/Mar/2025
