चिपळूण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवास प्रारंभ

चिपळूण : सांस्कृतीक राजधानी असलेल्या चिपळूण शहरातील बुरुमतळी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. रौप्य महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून, त्याचा प्रारंभलोकसभेच्या माजी सभापती सुमित्रा महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

याप्रसंगी मनोगतात चिपळूण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी शहरातील चांगल्या संस्थांना नेहमीच सहकार्य राहील, असे अभिवचन दिले, माजी आमदार रमेश कदम यांनी पंचवीस वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष सूचय रेडीज व प्रकाश देशपांडे यांच्या सहकार्याने चिपळूण नगरपरिषद पुरस्कृत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची सुरुवात कशी झाली याची आठवण सांगितली.

या वाचनालयामुळे शहरातील बुरुमतळी, पाग, रावतळे इ. भागातील वाचकांची मोठी सोय झाली आहे. यापुढेही नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले, प्रमुख उपस्थितीत लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी रौप्यमहोत्सवाचा शुभारंभास शुभेच्छा दिल्या.

वाचन संस्कृती टिकवणे अवघड होत असताना चिपळुणातील या दोन संस्था अभिनंदनीय काम करत आहेत याचे कौतुक केले, अजूनही चांगले उपक्रम घेऊन नित्य वाचकांची संख्या वाढवावी, असे आवाहन केले. या प्रसंगी व्यासपीठावर मान्यवगुसह माजी नगराध्यक्ष सूचय रेडीज, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत उपस्थित होते. यानिमित्ताने उदयोन्मुख प्रख्यात चित्रकार व शिरगावचे सुपुत्र संदीप ताम्हणकर यांचा सत्कार सुमित्रा महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी वाचनालयाच्या वतीने सुमित्रा महाजन यांचा सत्कार अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी केला.

रौप्यमहोत्सवी शुभेच्छा समारंभास लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे प्रकाश देशपांडे, अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, सरोज नेने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, माजी अध्यक्ष बाळकृष्ण चव्हाण, कोवळे, पत्रकार बंधू यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाबाबत प्रास्ताविक कार्यवाह सुमेध करमरकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची जोशी तर आभार प्रदीप पवार यांनी मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:00 PM 28/Mar/2025