Earthquake in Myanmar & Thailand : म्यानमार, थायलंडला 7.7 तीव्रतेचा भूकंप, अनेक गगनचुंबी इमारती, बंगले क्षणार्धात जमीनदोस्त; बँकॉकमध्ये आणीबाणी

Earthquake in Myanmar & Thailand : म्यानमारला शुक्रवारी भूकंपाचा मोठा धक्का बसला. हा धक्का एवढा तीव्र होता की, तो थायलंडची राजधानी बँकॉकमध्येही जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 एवढी मोजली गेली.

यात अनेक जण बपत्ता झाल्याचे वृत्त आहे.

म्यानमारमधील Sagaing हे भूकंपाचे केंद्र होते. या भूकंपामुळे म्यानमारमधील मंडाले येथील इरावती नदीवरील लोकप्रिय एवा ब्रिजही कोसळल्याचे वृत्त आहे. एवढेच नाही, तर चीन आणि तैवानच्या काही भागांनाही या भूकंपाचे धक्के जाणवल्याचे बोलले जात आहे.

या भूकंपाची तीव्रता एवढी तीव्र होती की, थायलंड आणि मॅनमारमधील अनेक शहरांतील इमारती अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. बँकॉकमध्ये टॉवर्स कोसळले आहेत. तर डझनावर लोक बेपत्ता झाले आहेत.

या भूकंपात हजारो लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे USGS चे म्हणणे आहे. महत्वाचे म्हणजे, मेघालयातील गारो हिल्समध्येही 4.0 एवढ्या तीव्रतेच्या भूकंपाचे झटके जाणवले. म्यानमारमधील मांडाले शहरात भूकंपामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. येथे अनेक मंदिरे आणि बौद्ध ठिकानांचेही नुकसान झाले आहे.

सोशल मीडियावर भूकंपाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यांत अगदी गगनचुंबी इमारतीही भूकंपाच्या धक्क्याने हलताना अथवा कोसळताना दिसत आहेत. तर अनेक इमारती झुकल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 28-03-2025