सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद स्थितीत आढळलेल्या एकावर गुन्हा

रत्नागिरी : तालुक्यातील वाटद येथे सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद स्थितीत आढळून आल्याप्रकरणी एकाविरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार २७ मार्च रोजी दुपारी १.३० वा. सुमारास करण्यात आली आहे.

दत्ताराम वामन रहाटे (५२, रा. वाटद परटवणे, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. दत्ताराम रहाटे हा गुरुवारी दुपारी तेथील सार्वजनिक ठिकाणी दारु पिउन मद्यधुंद अवस्थेत मिळून आला होता. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 AM 29/Mar/2025