चिपळूण : काविळतळी येथे गटारातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने नागरिक त्रस्त

चिपळूण : काविळतळी येथील परांजपे स्कीममधून येणारे गटारातील सांडपाणी वांगडे कॉम्प्लेक्स थेट रस्त्यावर येते. तसेच बीएसएनएल कार्यालयालगत गटार असून ते गटार तुडुंब भरले आहे. गटारातील पाणी शेजारील गाळ्यात जात आहे.

त्यामुळे नगर परिषद प्रशासनाकडून पाणी निचरा होण्यासाठी योग्य नियोजन करावे, अशा मागणीचे निवेदन नागरीकांनी मुख्याधिकारी विशाल भोसले यांना दिले आहे. नगर परिषदेकडे २ वर्ष सातत्याने पाठपुरावा करुनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पावसाळा तोंडावर आला की, हे काम करतो असे सांगितले जाते. गटारातील सांडपाण्याचा निचरा होण्याबाबत १५ दिवसांत कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, मुक्ता परांजपे, सुप्रिया कवितके आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 AM 29/Mar/2025