खेड : वेरळ येथील श्री समर्थ कृपा विद्यालयात युपीएससीबाबत मार्गदर्शन

खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वेरळमध्ये प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रत्येकाने नियमितपणे वर्तमानपत्राचे वाचन करून आपले सामान्य ज्ञान कसे वाढवावे, तसेच जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षा देऊन यशस्वी कसे व्हावे, याविषयी मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदूलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:18 PM 07/Oct/2024