MPSC : परीक्षा होऊन निकाल तीन महिने प्रलंबित…

नागपूर : MPSC | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एपीएससी) समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गट-अ आणि इतर बहुजन कल्याण अधिकारी गट-अ पदासाठी २५ डिसेंबर २०२४ ला ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. परंतु, अद्याप निकाल जाहीर झालेला नाही. तीन महिने होऊनही ऑनलाइन परीक्षेच्या निकालाला विलंब होत असल्याने परीक्षा विभागाच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

‘एमपीएससी’च्या वतीने २५ डिसेंबर रोजी समाजकल्याण सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ व सहाय्यक संचालक, संशोधन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, गट-अ पदासाठी सरळ सेवेअंतर्गत भरतीप्रक्रियेसाठी परीक्षा घेण्यात आली. परीक्षेची पहिली उत्तरतालिका २ जानेवारीला जाहीर झाली. यावर ६ जानेवारीपर्यंत हरकती मागवून अंतिम उत्तरतालिका २२ मार्चला जाहीर करण्यात आली. यानंतर अंतिम निकाल जाहीर होईल, अशी अपेक्षा उमेदवारांना होती. विशेष म्हणजे, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त पदासाठी अनेक वर्षांनंतर परीक्षा होत आहे. ( MPSC )

असे असतानाही ऑनलाइन परीक्षेला तीन तर अंतिम उत्तरतालिकेला एक महिना उलटूनही निकाल जाहीर झालेला नाही. आयोगाने लवकर निकाल जाहीर करून मुलाखती घ्याव्यात, अशी मागणी केली जात आहे. ( MPSC )

समाजकल्याण सहाय्यक आयुक्त गट-अ आणि इतर बहुजन कल्याण अधिकारी गट-अ पदाचा निकाल काही तांत्रिक बाबींसाठी थांबला होता. लवकरच तो जाहीर केला जाईल- – डॉ. सुवर्णा खरात, सचिव, एमपीएससी.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 PM 29/Mar/2025