संयुक्त राष्ट्र : देशातील बालमृत्यू दर कमी करण्यासाठी भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नाचे संयुक्त राष्ट्राने कौतुक केले. आयुष्मान भारत यासारख्या आरोग्याशी निगडित योजनेचे उदाहरण देत बालमृत्यू रोखण्यासाठी भारताने केलेले प्रयत्न अनुकरणीय असल्याचे नमूद केले. भारत सरकारने आरोग्य व्यवस्थेत धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून लाखो लोकांचे जीव वाचविले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राने केला.
संयुक्त राष्ट्राच्या एका समूहाने बालमृत्यू मूल्यांकनासंदर्भात मंगळवारी एक अहवाल सादर केला. त्यात भारत, नेपाळ, सेनेगल, घाना व बुरुंडी या देशांचा दाखला देत बालमृत्यू रोखण्यासाठी केलेल्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध धोरणांवर प्रकाश टाकला आहे.
नवजात शिशू मृत्युदरात ६१ टक्क्यांनी घट
वर्ष २००० पासून भारतात पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांच्या मृत्युदरात ७० टक्के घट झाली आहे. नवजात शिशूच्या मृत्युदरात ६१ टक्क्यांनी घट झाली आहे. आरोग्य संरक्षण वाढवणे, आरोग्य पायाभूत सुविधा व मानवी संसाधने विकसित करण्यासाठी घेतलेल्या विविध उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचे संबंधित अहवालात म्हटले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 29/Mar/2025














