चिपळूण : चिपळूण नगर परिषदेतर्फे आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आराखडा तयार करण्यासाठी २ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. ही बैठक इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे होणार आहे. या बैठकीला सर्व नागरिकांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.
दरवर्षी मे महिन्यापर्यंत आपत्ती व्यवस्थापन आराखडा बैठक घेऊन तयार केला जातो. मात्र, त्यानंतर प्रशासनाची घाई होते. तसेच नियोजनासाठी प्रशासनाला पुरेसा अवधी मिळत नाही. त्यामुळे यावर्षी दोन महिन्यांचा अवधी असतानाच आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे निधीची तरतूद करणेही सोपे होईल. या बैठकीसाठी सर्व शासकीय अधिकारी उपस्थित असतील. सर्व नागरिकांनीही उपस्थित राहावे, असे आवाहन मुख्याधिकारी भोसले यांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:59 PM 29/Mar/2025














