रत्नागिरी, दिनांक २९ मार्च २०२५: रत्नागिरीतील एमआयडीसी मिरजोळे परिसरात बेदरकारपणे गाडी चालवल्याने एका वृद्ध व्यक्तीला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली आहे. दि. २७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:१५ वाजण्याच्या सुमारास आय ए इंडस्ट्रीज प्लॉट क्रमांक ई-२१ समोरील रोडवर हा अपघात घडला. या प्रकरणी रत्नागिरी पोलीस ठाण्यात आरोपी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी (महिला) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील हुसेनमिया अब्दुल गफूर वस्ता हे दि. २७ मार्च रोजी सकाळी ११:१५ वाजता आय ए इंडस्ट्रीजमधून बाहेर पडले. ते रस्ता ओलांडून समोरील महालक्ष्मी किराणा स्टोअरच्या दिशेने पायी जात असताना आरोपी विनय विष्णू नागले याने आपल्या ताब्यातील इनोव्हा कार (क्रमांक MH.04 EF-4944) बेदरकारपणे आणि हयगयीने चालवली. रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता गाडी चालवल्याने त्याने हुसेनमिया यांना जोरदार ठोकर मारली. या अपघातात हुसेनमिया यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या.
या घटनेनंतर फिर्यादीने रत्नागिरी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. दि. २८ मार्च २०२५ रोजी पहाटे १:१९ वाजता गुन्हा क्रमांक ५७/२०२५ नोंदवण्यात आला. भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा १८४ अंतर्गत आरोपी विनय विष्णू नागले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:23 29-03-2025














