चिपळूण : सावर्डेतील गोविंदराव निकम विद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम

सावर्डे : क्रीडा व युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा परिषद, रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच अभ्यंकर कुलकर्णी कॉलेज रत्नागिरीच्या मैदानावर झाल्या. जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेत सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेच्या १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने बाजी मारून जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. यामुळे संघाला विभागस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी प्राप्त केली आहे.

जिल्हास्तरीय १९ वर्षे वयोगट शालेय कबड्डी स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील नऊ संघांनी सहभाग घेतला. सावर्डे विद्यालयाच्या कबड्डी संघाने चिपळूण तालुक्याचे प्रतिनिधित्व केले व विजय मिळविला. पहिला सामना दापोली संघाबरोबर तर लांजा संघाबरोबरच्या सेमी फायनल सामन्यात सावर्डे संघाने विजय प्राप्त केला व रत्नागिरी संघाबरोबर झालेल्या अटीतटीच्या फायनलच्या सामन्यात सावर्डे प्रशालेच्या संघाने अठरा गुणांच्या मोठ्या फरकाने विजयश्री खेचून आणली. पुढील विभागीय स्पर्धेसाठी सावर्डे विद्यालयाचा संघ सहभागी होणार आहे. शुभम नवरंग, अथर्व भुवड, आर्यन घाणेकर, वेदांत बाटले, आर्यन ओकटे, दर्शन राडे, मंगेश कदम, विराज हुमणे, वेदांत घाणेकर, सोहम खेराडे, सौरभ घाणेकर व सौरभ चव्हाण या खेळाडूंनी उत्तम खेळ करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. खेळाडूंना क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, अमृत कडगावे, रोहित गमरे, प्रशांत संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आ. शेखर निकम, अध्यक्ष बाबासाहेब भुवड, शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर, सर्व संस्था पदाधिकारी, सचिव महेश महाडिक, सह्याद्री क्रीडा प्रबोधिनी संस्थापक अनिरुद्ध निकम, प्राचार्य राजेंद्र वारे, उपप्राचार्य विजय चव्हाण, पर्यवेक्षक उद्धव तोडकर आदींनी कौतुक केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:04 PM 07/Oct/2024