देवरूख : नगर पंचायतीने कर वसुलीकरिता विशेष बसुली पथकांची नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीमाध्यमांद्वारे नागरिकांना घरपट्टी व पाणीपट्टी कराची रकम भरणा करुन नगर पंचायतीला सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी केले आहे.
सुट्टीचे दिवस असूनही ३० व ३१ मार्च रोजी नगर पंचायत कार्यालयामध्ये करभरणा करणेसाठी कार्यालय सुरु ठेवून नागरिकांना कर भरण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी अभिजीत राणे यांनी दिली. आर्थिक वर्षाच्या अखेरीस नगर पंचायतीच्या करसंकलन विभागाकडून करथकबाकीदारांवर कारवाई सुरु करण्यात आली आहे.
थकित करवसुलीसाठी वारंवार तगादा लावूनही करभरणा न केलेल्या करदात्यांचे नळकनेक्शन कापण्याची कारवाई सुरु असून एकूण ९ नळकनेक्शन तोडण्यात आली आहेत. त्याचबरोबर जप्तीच्या नोटीस थकीत मालमत्ताधारकांना बजावण्यात आल्या आहेत. थकबाकीवर नगरपंचायत अधिनियमनुसार प्रतिमहिना २% म्हणजेच वार्षिक २४% दंडाची आकारणी केली जाणार असून, त्यात कुठलीही सूट नसल्याने थकीत करदात्यांना १ एप्रिलनंतर आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:10 AM 31/Mar/2025














