चिपळूण : वाढत्या उष्म्यामुळे तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. प्रशासनाकडे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठीच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. आतापर्यंत १० गावांतील वाड्यांनी टँकरसाठी अर्ज केले आहेत. वातावरणातील वाढता उष्मा लक्षात घेता, येत्या काही दिवसांत पाणीटंचाईची भीषण परिस्थिती होण्याची शक्यता आहे.
आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पंचायत समितीत टंचाईग्रस्त कृती आराखडा तयार करण्यासाठी बैठक झाली. यावेळी तहसीलदार प्रविण लोकरे, गटविकास अधिकारी उमा घार्गे पाटील व पाणी पुरवठाविभागाचे अधिकारी उपस्थित होते.
तालुक्यातील ५२ गांवे आणि २४७वाड्यांचा टंचाईग्रस्त आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. या टंचाईग्रस्त आराखड्यामध्ये कळकवणे, कोसबी, तर टेरव व कळवंडेमधील सर्वच वाड्या टंचाईग्रस्त आहेत.
करंबवणे, आगवे लिबेवाडी, हुमणेवाडी, मधलीवाडी, अनारी, कोळकेवाडी धनगरवाडी, कळकवणे धनगरवाडी, कामथे बुद्रुक, कदमवाडी, खेर्डी, कामथे खुर्द धनगरवाडी, गुढे, तुरंबव रामवाडी, शिरवली वेलोंदेवाडी, परशुराम पायरवाडी, अडरे, कोंडमळा, सावर्डा, येथील सर्वच वाड्या टंचाईग्रस्त आहेत. नारदखेरकी वीर जावळेवाडी, भोईवाडी व उपकेंद्र, कादवड, पालवणमधील सर्व वाड्या, आकले बौद्धवाडी, चोरगेवाडी, गजमलवाडी, कांगणेवाडी, डेरवण खालचीबौद्धवाडी, धनगरवाडी, फौजदारवाडी, गवळवाडी एक व दोन, गुजरवाडी, शिर्केवाडी, चव्हाणवाडी, डेरवण खुर्द सुतारवाडी, बौद्धवाडी, पोफळीमधील ऐनाचेतळे, होडेवाडी, करंजावडेवाडी, मानकरवाडी, पंडववाडी, पोफळी कॉलनी, पोफळी नाका, सरफरेवाडी, कातकरवाडी, पोफळी बुद्रुक बौद्धवाडी, पवारवाडी, तांबडवाडी, सुतारवाडी, सव्यदवाडी दोन व सय्यदवाडी तिन, तळसरमधील सर्व वाड्या, तिवडीमधील चोरगेवाडी, खालचीवाडी, उगवतवाडी, बौद्धवाडी. तिवरेमधील हेलणवाडी, गावठाण व सुतारवाडी. रेहेळभागाडीमधील सकपाळवाडी, मुर्तवडे कुटलवाडी, खडपोली गोकुळवाडी, नांदीवसे स्वयंदेव व राधानगर, रिक्टोली संपुर्णगाव, मिरजोळीमधील साखरवाडी, कदमवाडी, चर्मकारवाडी, पवारवाडी, महालक्ष्मीनगर, पाचाडमधील घोलेवाडी, बुरूवाडी. निवळीमधील राऊळवाडी, बौद्धवाडी, काजारेवाडी, कोदारेवाडी, खांबेवाडी, कातळवाडी, कात्रोळी, मुढेतर्फे सावर्डे आदी गावे आणि तेथील वाड्यांचा टंचाईग्रस्त समावेश आहे.
दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाई यावर्षी देखील कायम आहे. मार्च महिना उजाडताच प्रशासनाने टँकरव्दारे पाणीपुरवठा करावा, यासाठीचे अर्ज दाखल झाले आहेत. सध्या वातावरणात कमालीचा उष्मा वाढला असून नैसर्गिक जलस्त्रोत रिकामे होवू लागले आहेत. असे असताना त्यावर अवलंबून असणाऱ्या कादवड, सावर्डे, आनारी, अडरे गावातील धनगरवाड्यांना आतापासूनच पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. त्यामुळे प्रशासानाने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, यासाठीचे पाहिले अर्ज या वाड्यातून दाखल झाले आहेत.
धनगरवाड यांप्रमाणेच तालुक्यातील इतर गावांनाही पाणी टंचाईची झळ बसू लागली असून, यामुळे प्रशासनाकडे टँकरसाठीच्या दिलेल्या अर्जामध्ये वाढ होऊ लागली आहे. यामध्ये नारदखेरकी, कोसबी, करंबवणे-बंदरवाडी, बौध्दवाडी, पाचाड, डेरवण, अनारी, कादवड आदी गावांचा समावेश आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:34 AM 31/Mar/2025














